SnatchApp हे संदेशाची मोफत देवाणघेवाण आणि फोन करण्यासाठीचे ऍप आहे, ज्यामुळे लोकांना तसेच व्यवसायांना इंटरनेट जोडणीद्वारे जगभरामध्ये सुरक्षितपणे संवाद साधणे शक्य होते.
इत्यंभूत एनक्रिप्टेड संदेश, जलद आवाजी संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ, कागदपत्रे, इमोजी, कॉल आणि व्हिडिओ कॉल पाठवण्याचा आणि मिळवण्याचा हा एक सोपा व सुरक्षित मार्ग आहे.
SnatchAppमध्ये आमचे ध्येय अगदी साधे आहे: आपल्या जवळच्या माणसांच्या संपर्कात राहाण्यासाठी लोकांना मदत करणे. हे ध्येय प्रत्यक्षात साकारण्यासाठी आम्ही मोफत, सुरक्षित, ग्राहक-पूरक आणि सर्वत्र उपलब्ध असलेले उत्पादन तयार केले आहे. तुम्हाला तुमच्या सर्व उपकरणांवरून एकाच वेळेस आपले संदेश पाहता येतात.
SnatchAppमध्ये चॅटबॉट्सचाही समावेश करण्यात आला आहे आणि त्यामुळे जगाच्या अक्षरशः प्रत्येक कानाकोपऱ्यात अब्जावधी संदेशांची खासगी आणि सुरक्षितपणे देवाणघेवाण करता येते.
SnatchApp 53 भाषांत उपलब्ध आहे.
SnatchApp का वापरावे:
• मोफत आवाजी आणि व्हिडिओ एनक्रिप्टेड कॉल्स: तुमचा पीसी किंवा स्मार्टफोन वापरून मित्रपरिवार आणि कुटुंबियांशी मोफत संपर्क साधता येतो. अगदी, ते दुसऱ्या देशात असले तरी. SnatchApp तुमच्या सेल्युलर प्लॅनची आवाजी मिनिटे वापरण्या ऐवजी तुमच्या फोनची इंटरनेट जोडणी (उपलब्धतेनुसार, 4G/3G/2G/एज किंवा वाय-फाय) वापरत असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक संदेश किंवा कॉलसाठी पैसे भरावे लागत नाही. (सूचना – वाय-फायवरील कॉल्स मोफत आहेत. प्रमाणित डेटा शुल्क आकारले जाऊ शकते.)
• सुरक्षित संदेश आणि विश्वासार्ह संपर्क: सर्व संदेश आणि कॉल्सचे इत्यंभूत एनक्रिप्शनच्या आधारे सुरक्षित केले जातात. तुमच्या इत्यंभूत एनक्रिप्शनची सुरक्षा तुमच्या संपर्कांबरोबर पडताळून पाहा आणि योग्य व्यक्तीशी बोलत असल्याची खात्री करून घ्या.
• ग्रुप चॅट आणि कॉल्स: SnatchAppचा वापरून तुमच्या जवळच्या लोकांच्या गटाच्या संपर्कात राहा. ग्रुप कॉल्स करा. मोठे व्हिडिओ, मजकूर, कोणत्याही प्रकारची कागदपत्रे, छायाचित्रे, ऑडिओ, लोकेशन संदेश आणि बरंच काही ग्रुपमध्ये शेअर करण्याचा आनंद घ्या.
• SnatchApp वेब: SnatchApp तुमच्या वेब ब्राउजरवरही अवलंबून आहे. https://web.snatchapp.me
• बॉट्ससाठी पसंतीचे चॅनेल: जर तुम्ही चॅटबॉट तयार करण्याचा आणि अंमलात आणण्याचा विचार करत असाल, तर SnatchAppचे खासगी आणि सुरक्षित ऍप्लिकेशन वापरून तुम्हाला तुमच्या बॉटची अंमलबजावणी करू शकता, चाचणी करू शकता आणि संवाद साधू शकता.
• रियल टाइम लोकेशन: इतरांना तुम्ही कुठे आहात हे सांगण्याऐवजी फक्त रियल टाइम लोकेशन वापरून कोणत्याही संवादात नकाशांचा समावेश करा.
• तुमचा आवाज बदला: तुमच्या प्रियजनांना सुखद धक्का द्यायचा आहे का? SnatchApp तुम्हाला तुमच्या आवाजाची पातळी बदलण्यास मदत करतं. तुमचा बदललेला आवाज ऐकण्याची गंमत अनुभवा!
सुरक्षा:
• सुरक्षित: SnatchAppवरील सर्व संदेश 256-बिट सिमेट्रिक एईएस एनक्रिप्शन, 2048-बिट आरएसए एनक्रिप्शन आणि प्रत्येक संदेशासाठी सिक्युअर की एक्सचेंज वापरून एनक्रिप्ट केले जातात. SnatchAppवरून पाठवलेले कोणतेही संदेश आम्हाला वाचता येत नाही. तुम्ही SnatchAppद्वारे पाठवलेले कोणतेही संदेश आणि मीडिया फाइल्स आम्ही साठवून ठेवत नाही.
• श्रेडर: तुमच्या उपकरणावरील संदेश आणि प्रतिमांपासून ते व्हिडिओंपर्यंतची सर्व सामग्री कायमस्वरूपी नष्ट करता येऊ शकते.
• एनेबल/डिसेबल डिसऍपरिंग मेसेजेस (संदेश गायब करणे सक्षम/अक्षम करा): संवादादरम्यान पाठवलेले सर्व संदेश पाहिले गेल्यानंतर आपोआप नष्ट होतील.
• टायमर लावा: तुमच्या सर्व संदेशांचा कालबाह्यता वेळ कॉन्फिगर करा.
• सुरक्षितपणे संपर्क साधा: तुमचे पत्ता पुस्तक कायम खाजगी राहील आणि आमच्या सर्व्हरवर कधीही साठवले जाणार नाहीत. गुगल, याहू, आउटलूक, ईमेल, फोनमध्ये समाविष्ट केलेले फ्रेंड फाइंडर.
• 100% मोफत आणि जाहिराती नाहीत: SnatchApp हे मोफत असून अनिश्चित काळासाठी मोफत राहील.
---------------------------------------------------------
SnatchAppविषयक अधिक माहितीसाठी आमचे अधिकृत संकेतस्थळ पाहा. http://snatchapp.me