WhatsApp from Meta हे १००% विनामूल्य मेसेजिंग ॲप आहे. १८० हून अधिक देशांमधील २ अब्जांहून अधिक लोक हे ॲप वापरतात. अगदी सहजरीत्या तुमच्या मित्रमैत्रिणींच्या आणि कुटुंबीयांच्या संपर्कात राहू देणारे हे ॲप अतिशय सोपे, विश्वासार्ह आणि खाजगी ॲप आहे. WhatsApp हे कोणत्याही सदस्यत्व शुल्काशिवाय* मोबाइल आणि डेस्कटॉपवर अगदी धीमे कनेक्शन असतानाही काम करते.
जगभरात कुठेही आणि कोणासोबतही करता येणारे खाजगी मेसेजिंग
तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी व कुटुंबाला केलेले खाजगी मेसेजेस आणि कॉल्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात. तुमच्या चॅटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींखेरीज इतर कोणीही, अगदी WhatsApp देखील ते चॅट वाचू किंवा ऐकू शकत नाही.
*डेटा शुल्क लागू शकते. अधिक माहितीसाठी तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधा.
---------------------------------------------------------
कोणतेही अभिप्राय किंवा प्रश्न असल्यास WhatsApp > सेटिंग्ज > मदत > आमच्याशी संपर्क साधा यावर जा