आपली मल्टीमीडिया सामुग्री ऐकणे आणि पाहणे अधिक आनंददायक बनवण्यासाठी मीडिया प्लेअर डिझाइन केले आहे. मीडिया प्लेअर याच्या केंद्रस्थानी एक पूर्ण-वैशिष्ट्यीकृत संगीत लायब्ररी आहे जी आपल्याला संगीत त्वरित ब्राउझ आणि प्ले करण्याची तसेच प्लेलिस्ट तयार आणि व्यवस्थापित करण्याची सुविधा देते. आपल्या PC वरील संगीत आणि व्हिडिओ फोल्डरमधील आपली सर्व सामुग्री आपल्या लायब्ररीमध्ये आपोआप दिसून येईल.